।। शूरवीर बाजी पासलकर ।।
या वार्ता विजापूरला आदिलशाहच्या कानावर पडू लागल्या होत्या. संतापलेल्या आदिलशाहने बंडखोर शिवाजी राजांच्या (छत्रपती शिवाजी महाराज यांना त्यावेळी पातशाही एक बंडखोर जहागीरदार मानत) बंडखोरीला शहाजी महाराजांना जबाबदार ठरवून कैद केले आणि शेर-ए -जंग फत्तेखानला हे बंड मोडून काढण्यासाठी २०००० ची फौज देऊन रवाना केले.
'जैसे कंसाने कृष्णाला मारायला गोकुळात राक्षस पाठविले होते, तैसाच शिवाजी महाराजांच्या राम राज्यावर, स्वराज्यावर घाला घालायला आदिलशाहने पाठविलेला हा पहिला राक्षस पाठविला होता.'
ही स्वराज्यावर आलेली पाहिली मोठी आपदा होती. प्रसंग मोठा बाका होता, एकीकडे वडील शहाजी महाराज हे आदिलशाहच्या कैदेत आणि दुसरीकडे पुरेसे बाळसे सुद्धा न आलेले शिवाजी महाराजांच स्वराज्य.
फत्तेखान जर स्वराज्याच्या आतापर्यंत आला तर स्वराज्य नष्ट होईल,यात गरीब रयत भरडली जाणारअश्या परिस्थितीत शत्रूला स्वराज्याच्या गाभ्यात आतपर्यंत येऊ देणे योग्य नाही, हे महाराजांचा चांगलेच माहित होते. म्हणुन या फत्ते खानाशी सीमेवरच निपटायचे असे ठरविले.
यासाठी महाराजांनी पुरंदर हा किल्ला निवडला.पुरंदर हा किल्ला तेव्हा स्वराज्यात नव्हता. महादजी निळकंठराव यांच्या ताब्यात किल्ला होता. त्यांच्या भावाभावांमधील भांडणाचा फायदा उठवून नेताजी पालकर आणि नूर खाँ बेग यांच्या मदतीने महाराजांनी किल्ल्यात प्रवेश करून किल्ला ताब्यात घेतला.
फत्तेखान नावाची ही आपदा आपल्या फौजेनिशी बारामती मार्गे स्वराज्याच्या सीमेवर येऊन धडकली. फत्तेखानने येताच बाळाजी हैबत करवि हल्ला करून गुंजवणे मार्गावरील किल्ले सुभानमंगळ जिंकून घेतला आणि जेजुरीजवळ बेलसर येथे आपली छावणी टाकली. महाराजांनी गोदाजी जगताप,कावजी मल्हार यांना पाठून किल्ले सुभानमंगळ एकाच रात्रीत जिंकून स्वराज्यात परत सामील केला.
एकाच रात्रीत किल्ले सुभानमंगळ जिंकून घेतल्यामुळे फत्तेखान संतापला होता. त्याला शिवाजी महाराज स्वतः पुरंदरवर असल्याची सूचना मिळताच, पुरंदर किल्ल्यावर हल्ल्याचा मनसुबा केला.फत्तेखानाचा सरदार मुसेखानाने पुरंदरवर हल्ला करून किल्ल्याला वेढा दिला.किल्ल्याजवळ खानच्या सैन्याचे आणि मावळ्यांचे तुंबळ युद्ध जुंपले. कान्होजी जेधे ,बाजी जेधे ,गोदाजी जगताप ,कावजी मल्हार यांनी शिवाजी महाराज आणि सरसेनापती बाजी पासलकर यांच्या नेतृत्वाखाली मावळ्यांनी मोठा पराक्रम गाजवला. फत्तेखानचा सरदार मुसेखान व गोदाजी जगताप एकमेकाला भिडले.दोघात तुंबळ युध्द झाले.अखेरीस गोदाजीच्या वाराने मुसेखानाच्या छाताडाचा वेध घेतला व खान कोसळला.मावळ्यांनी गनिमाची कत्तल केली,गोपानीच्या दगडाचा मार दिला त्यामुळे खानच्या सैन्याची पळता भुई थोडी झाली. खानाचे अपयशी सैन्य मार खाऊन बेलसरच्या छावणीवर माघारी गेले.
शिवाजी महाराजांनी शत्रूच्या मुख्य केंद्रावर म्हणजे फत्तेखानाच्या बेलसर येथील छावणीवर छापा घालण्याचा डाव आखला आणि
"शिवबां ह्यो डावं आमचां ...ह्यो मनसूबां म्यां करतूं"
असंं म्हणून पासष्ट वर्षाचे सरसेनापती बाजी पासलकर पुढे झाले.महाराजांनी त्यांना नकार देत सांगितलं,
"बाजीकाकां आपण कश्याला...?आपण सर्वात वयस्कं आहात, सर्वात जास्तं अनुभवी आहातं ,आपली आम्हांस गरजं आहे. या स्वराज्याला आपल्या मार्गदर्शनांची गरजं आहे . आपण जीवं धोक्यात न घालणे. स्वतः आम्ही चालूनं जातो, आपण पिछाडी राखावी."
पण बाजी हट्टाने शिवाजी महाराजांला म्हणाले,
"न्हायं शिवबां आपल्या स्वराज्यावर चालून आलेल्या ह्या राकीसाचां वदद् करायां म्यां जातूं .ह्यो सरसेनापती बाजी जीतां असताना महाराजांना जाण्याची गरजं ती काय .... तुम्हासं आयं जगदंंबेची आनं हायं,तु मला रोखणारं न्हाय."
कावजी मल्हार आणि काही मावळ्यानिशी सरसेनापती बाजी पासलकरांनी फत्तेखानाच्या छावणीवर अचानक हल्ला केला. कोणी विचार नसेल केला कि वीस हजारी सैन्य छावणीवर कोणी हल्ला करेल.असे म्हणून बेसावध असलेल्या फत्तेखानाचे सैन्य अचानक झालेल्या हल्ल्याने गांगरून गेल,सैर-भैर झाले .मावळ्यांनी मोठ्या प्रमाणात गनिम कापून काढले, मावळ्यांनी बेसावध गनिमाची दाणादाण उडवली.छावणीत मोठी धूमचक्री माजली होती.
आत्ता गनिम सावध झाला होता ,पलट वार करू लागला होता हे जणू बाजींनी पीछेहाट करायला सुरवात केली ती पण विजयश्री घेऊन.या विजयामुळे मावळ्यांनाही चांगलाच हुरूप चढला होता ,तेही लवकर पाठी हटत न्हवते.
तेवढ्यात घात झाला ,लढत्या बाजीच्या तलवारधारी हातावर पाठीमागून वार झाला. त्या भ्याडाचा प्रतिकार करण्यासाठी बाजी मागे वळले आणि तोच क्षणी गनिमाची तलवार त्यांच्या छातीत उतरली.पासष्ट वर्षाचा हा पराक्रमी योद्धा पडला ...!
सरसेनापती पडले हे कळताच कावजी मल्हार सासवडला धाव घेतली. जखमी बाजींना त्यांच्या 'यशवंती' घोडीवर लादून कावजी मल्हार यांनी धनुष्यातून सुटणाऱ्या तीराच्या वेगाने घोडदौड केली.आपल्या धन्याचं जखमी शरीर पाठीवर लादून वाहून नेणारी बाजींची यशवंती घोडी आणि कावजी मल्हार यांचे दु:ख एक समानच ! पुरंदर येईतो बाजींनी अखेरचा श्वास रोखून ठेवला, फक्त आपल्या विजयी राजाला - शिवरायांना पहाण्यासाठी व दोन अखेरचे शब्द बोलण्यासाठी शिल्लक ठेवली होती.
शिवाजी महाराजांना हि वार्ता कळली आणि त्यांनी सरळ बाजींच्या घोड्याला सामोरी धाव घेतली.बाजींचे छिन्नभिन्न जखमी शरीर तोलले आणि बाजींचे डोके मांडीवर घेऊन टाहो फोडत विचारते झाले,
"बाजीकाका,आम्हांस असंं पोरकं करून कुठं चाललातं?"
महाराजांच्या त्या पडत्या आसवांनी बाजींच्या जखमा चुरचुरल्या पण आपलंं बलिदान महाराजांच्या या अभिषेकने पावण झाले या जाणिवेनंं जणू बाजींच उर भरून आल होत.... जणू मारण्याच्या दारात पण त्या वयस्क गालमिश्या थरथरतल्या...! अखेरचा तो श्वास एकवटून बाजी करारी आवाजात म्हणाले ,
"शिवबां, तुलां भेटलूं ,माझ्या औक्षाचं सोनं झालं रं मांज्या ल्येकरां ! मरताना तुजी मांडी भेटली. शिवबा , मांज्या ल्येकरां चिंता नगं करू म्या चाललूं तरी माजां नातूं बाजी जेधे अन् त्याचा बा कान्होजी जेधे हाय तुज्या सोबतीला. म्यां त्या फत्तेखानाचंं मुंडकं घेऊन येनारं व्हतूं पर त्यो निसटला.ह्यो एक डावं माफी करं....शिवबां, म्या म्होरच्या जनमि पुन्यांदा येनं स्वराज्यासाठी लढायां....जय काळकाई ...!"
शिवाजी महाराजांच्या मांडीवर जीव सोडून बाजी निघून गेले आणि महाराजांचा हुंदका फुटला.
https://m.facebook.com/story.php?story_fbid=469420700188851&id=354068648390724
किल्ले पुरंदर
किल्ले सुभानमंगळ (भुईकोट )



No comments:
Post a Comment